परदेशात पतीकडून होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला भारतातही न्याय मिळू शकतो, हे पुणे न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या पतीने पत्नीला भारतात परत पाठवले, त्यानंतर पत्नीने पुण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली.
पतीने युक्तिवाद केला की ही घटना अमेरिकेत घडली असल्याने भारतीय न्यायालयाचे कार्यक्षेत्र नाही. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने पतीला पत्नीसाठी दरमहा १ लाख रुपये अंतरिम खर्च देण्याचे आणि पुण्यातील सामायिक घरात तिला राहण्याचा अधिकार देण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने स्पष्ट केले की ‘कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, २००५’ परदेशातील भारतीय, ओसीआय कार्डधारक आणि परदेशी महिलांनाही संरक्षण देतो. यामुळे आता परदेशी महिलांनाही भारतात परत येऊन न्याय मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – चैतन्य पगारे











































.jpeg?updatedAt=1710502263253)
