गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) प्रवाशांच्या सोयीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील पाच प्रमुख बस स्थानके तात्पुरत्या स्वरूपात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान रस्ते बंद असले तरी बससेवा सुरळीत सुरू राहील.
मिरवणुकीमुळे छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि इतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, नटराज, स्वारगेट, शाहू महाराज चौक आणि डेक्कन जिमखाना येथील थांबे हलवण्यात आले आहेत.
📌 नवीन बस थांबे:
- शाहू महाराज चौक → लक्ष्मी नारायण चौक
- नटराज → पर्वती पायथा, सिंहगड रस्ता
- स्वारगेट → वेगा सेंटर (सोलापूर/भवानी पेठ मार्ग)
- डेक्कन जिमखाना → एसएनडीटी कॉलेजजवळ
👉 PMPML चे आवाहन – प्रवाशांनी बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































