पुण्याच्या जगप्रसिद्ध गणेशोत्सवासाठी यंदा पोलिसांकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल ८ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी, होमगार्ड्स आणि राज्य राखीव दलाचे जवान तैनात राहणार आहेत.
विशेषतः मानाच्या गणेश मंडळांच्या मार्गांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन कॅमेरे आणि चेहरा ओळख प्रणालीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण ठेवले जाणार आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथक’ सज्ज असून, साध्या वेशातील पोलिस कर्मचारी गर्दीवर बारीक लक्ष ठेवतील.
हा संपूर्ण बंदोबस्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना शांततेत आणि सुरक्षिततेत उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































