घोरपडे पेठ परिसरात विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनादरम्यान गंभीर प्रकार घडला आहे. वाहतूक नियमन करत असलेल्या व्यक्तीला काही लोकांनी मारहाण केली. त्यानंतर चौकशीसाठी गेलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेत एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयादशमी निमित्त शहरात विविध भागांत संचलने काढण्यात आली होती. घोरपडे पेठ परिसरातील संचलनादरम्यान वाहतुकीचे नियमन करण्यासाठी काही स्वयंसेवक तैनात होते. यावेळी अचानक काही लोकांनी त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच संघाचे इतर कार्यकर्ते चौकशीसाठी गेले, मात्र टोळक्याने त्यांनाही मारहाण केली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. मारहाणीच्या प्रकरणात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
सध्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विजयादशमीसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी साक्षी पांचाळ












































