पुणे: समूहगीत स्पर्धेत गोळवलकर शाळेचे यश

पुणे, २४ जानेवारी २०२३ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत शाळांसाठी घेण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत मा. स. गोळवलकर गुरूजी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला.

शास्त्रीय गायक पंडित राजेंद्र कंदलगावकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, सदस्य मिलिंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

समूहगीतात सूर, ताल, लय, शब्द, चाल यांचा परिपाक असावा, ते जोशपूर्ण असावे तर त्याचा प्रभाव पडतो असे मत कंदलगावकर यांनी व्यक्त केले.

देशभक्तिचे संस्कार अधिक दृढ होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केल्याचे डॉ. कुंटे यांनी सांगितले.

डीईएस मातृमंदीर, गोळवलकर गुरुजी विद्यालय, एनईएमएस, अहिल्यादेवी यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक मिळविले. या स्पर्धेत ७ हजार पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विनायक गुरव, मोहिनी सोहनी, डॉ. अतुल कांबळे आणि होनराज मावळे यांनी परीक्षण केले. वरदा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन व हर्षदा कारेकर यांनी आभार मानले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा