गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे १४५ कोटी खर्चून पुणेकर रस्त्यांचा अनुभव घेणार!

१४५ कोटी खर्चून पुणेकर रस्त्यांचा अनुभव घेणार!

पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेमुळे शहरातील रस्ते आता चकाचक होणार आहेत. तब्बल १४५ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून, ७५ किलोमीटर लांबीच्या मार्गावरील रस्ते पुढील दोन ते तीन महिन्यांत दुरुस्त केले जाणार आहेत.

या निर्णयामुळे केवळ स्पर्धेतील खेळाडूंनाच नव्हे तर पुणेकरांनाही आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. खड्डेमुक्त रस्त्यांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल. विशेष म्हणजे ही स्पर्धा लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ साठी पात्रता फेरी असल्याने जगभरातील दिग्गज खेळाडू पुण्यात दाखल होणार आहेत.

यामुळे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावलौकिकात भर पडणार असून, नागरिकांना उत्तम पायाभूत सुविधा आणि दर्जेदार रस्त्यांचा लाभ मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version