पुणे हाफ मॅरेथॉन’मध्ये गोरखा रेजिमेंटच्या तीर्थ पुन याला विजेतेपद

पुणे : पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या. ‘बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन’मध्ये गोरखा रेजिमेंटच्या तीर्थ पुन याने विजेतेपद पटकावले. यात तब्बल वीस हजार धावपटूंनी सहभाग घेतला. या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन मार्गाच्या दुतर्फा परिसरातील नागरिकांसह विविध संस्थांनी गर्दी गेली होती. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पहाटे सव्वापाच वाजता नामवंत धावपटूंचा सहभाग असलेल्या २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली.
मान सिंग दुसऱ्या तर, विक्रम बी तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तीर्थने १ तास ५ मिनिटं ५४ सेकंद एवढ्या वेळेत निर्धारित अंतर कापले. तर, मान सिंगनं १ तास ७ मिनिटं १८ सेकंद वेळ नोंदवली. त्या पाठोपाठ विक्रमनं १ तास ७ मिनिटं ५० सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली. मुख्य शर्यतीसह पाच आणि दहा किलोमीटर शर्यतही आयोजित करण्यात आली होती. तसेच, फॅमिली मॅरेथॉनचंही आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेची ऑलिम्पियन धावपटू जॅनेट चेरोबोन-बॉक्कम स्पर्धेची “ब्रॅंड अँबेसिडर’ होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा