पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाची घंटा वाजली आहे! 🎉
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शहर विभागीय क्रीडा समितीच्या वतीने पुणे शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं असून यंदा थरारक जल्लोषाची मेजवानी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.
🔹 ८ हजारांहून अधिक विद्यार्थी खेळाडू विविध स्पर्धांमध्ये आपली ताकद, कौशल्य आणि जिद्द दाखवणार आहेत.
🔹 ४३ खेळांच्या स्पर्धा – महिला व पुरुष अशा दोन गटांमध्ये रंगणार.
🔹 ३० हून अधिक महाविद्यालयं यंदा क्रीडा महोत्सवाची साक्षीदार ठरणार.
ही माहिती पुण्यातील कॅम्प येथील पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी पुणे शहर विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. अय्याज शेख यांनी स्पर्धांच्या वेळापत्रकासह अनेक महत्त्वाच्या तपशीलांची माहिती दिली.
पत्रकार परिषदेच्या वेळी पुणे शहरी विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष व पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. तर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. सुदाम शेळके यांनी चार विभाग, स्पर्धांचे प्रकार आणि आयोजनाचे स्वरूप यावर प्रकाश टाकला.
🏆 यंदाचा क्रीडा महोत्सव फक्त स्पर्धाच नाही, तर पुण्याच्या तरुणाईच्या स्वप्नांचा, मेहनतीचा आणि जिद्दीचा उत्सव ठरणार आहे!
न्यूज अनकट प्रतिनिधी वैभव वाईकर













































