पुणे बाजारपेठेत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जुन्या कांद्याचा साठा आणि नवीन लाल कांद्याची आवक एकाच वेळी मोठ्या प्रमाणात झाल्याने कांद्याला प्रति किलो केवळ ८ ते १२ रुपये इतका कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सोडा, साधा वाहतूक खर्चही निघणे अवघड झाले आहे.
गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच कांद्याचे दर इतके खाली आले आहेत. एप्रिल महिन्यात २० रुपये किलोपर्यंत भाव मिळत असताना, चांगल्या दराच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा आता अक्षरशः मातीमोल भावात विकावा लागत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, कांद्याचे उत्पादन वाढले आहे, पण निर्यात धोरण आणि वितरण व्यवस्था योग्य नसल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या परिस्थितीवर सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे













































