पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे?

49

पुणे: पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारकडून भाजपचे वर्चस्व असलेल्या महापालिकांवर वचक निर्माण करण्यासाठी ही खेळी खेळली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आयुक्त सौरभ राव यांची पुढील काही दिवस बदली होऊन त्यांच्याजागी मुंढेंची नेमणूक होण्याची शक्यता आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार येताच २००९ मध्ये मंत्रालयासह काही ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी बदलण्यात आले होते. त्याचप्रमाणे ठाकरे सरकार देखील विरोधकांना शह देण्यासाठी त्यांच्याचं चालीचा उपयोग करणार असल्याचं दिसत आहे. सध्या अधिकारी असलेल्या सौरभ राव यांच्या कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुंढे यांनी काम केले आहे. कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. मुंढे यांनी राजकारण्यांविरोधात जाऊन अनेक निर्णय घेतले. पीएमपी’च्या कारभारात नव्या बदलाचे निर्णय घेत त्यांनी आपल्या स्टाइलने सत्ताधारी भाजपला नाकीनऊ आणले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा