शहरात अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची मोहीम सुरू आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रिक्षातून ‘एमडी’ (मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून रिक्षासह सुमारे ७ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्याचे नाव मुजम्मील वाजीद खान (२५, रा. कोंढवा खुर्द) आहे. २ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना, नशेमन बिल्डिंगसमोर त्यांची रिक्षा संशयास्पदरीत्या उभी दिसली. पोलिसांनी मुजम्मील खानला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता, २६ ग्रॅम ‘एमडी’, दोन मोबाईल फोन आणि दीड लाख रुपयांची रिक्षा जप्त झाली. जप्त मालाची एकूण किंमत ६ लाख ९८ हजार रुपये आहे.
मुजम्मील खानने सांगितले की, हा एमडी विक्रीसाठी साथीदाराने दिला होता. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे पुणे शहरातील अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराला मोठा धक्का बसला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे











































