पुणे महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. विरोधकांनी भाजपच्या सोयीसाठी प्रभाग रचना केल्याचा आरोप केला असून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने ही रचना रद्द करून नव्याने हरकती आणि सूचना मागवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अनेक पक्षांनीही रचनेवर आक्षेप नोंदवले आहेत.
विरोधकांचा आरोप आहे की नैसर्गिक सीमा दुर्लक्षित करण्यात आल्या असून, अनुसूचित जातींच्या आरक्षणांवर अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे.
जाहीर झालेल्या रचनेवर ३ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रशासनाकडून सुनावणी होऊन योग्य हरकतींवर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे












































