“महापालिकेच्या सुरक्षेवर गंडांतर! ३९१ पदे रिक्त, जुनी शस्त्रे आणि अमान्य गणवेशांवर पुणेकरांचा जीव!”

पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाची स्थिती गंभीर बनली आहे. ६६६ मंजूर कायमस्वरूपी पदांपैकी तब्बल ३९१ पदे रिक्त असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरक्षा विभागाने आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत. नवीन शस्त्रे, आधुनिक गणवेश, वॉकीटॉकी, तपासणी साधने आणि सुरक्षा वाहनांची तातडीने गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या जुन्या शस्त्रांवर, अमान्य गणवेशांवर आणि अपुऱ्या साधनांवर महापालिकेच्या मुख्य इमारती, रुग्णालये, कार्यालये आणि महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा अवलंबून आहे. जर या मागण्या तातडीने पूर्ण केल्या नाहीत, तर सुरक्षेवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी गंभीर भीती व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे