पुणे महापालिका घेणार जलपर्णी काढण्याचे मशीन

पुणे : नद्यांवरील जलपर्णी हटविण्यासाठी पुणे महापालिकेने स्वत:चीच मशीन घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने भारतातच तयार होणाऱ्या या मशीन खरेदीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
हे मशीन बनविणाऱ्या संबंधित कंपनीचे तज्ज्ञ पुणे शहरातील नद्या व तलावांमधील जलपर्णीची पाहणी करण्यासाठी पुण्यात आले आहेत.
या पाहणीमध्ये पुणे शहरातील नदीमध्ये सहजरीत्या चालू शकेल तथा जलपर्णीची खोलवर रुजलेली पाळेमुळेही काढू शकेल, अशा प्रकारच्या मशिनची रचना करून तिचा पुरवठा करण्यात येणार आहे.

केरळ येथील ‘केलाचंद्र प्रेसिशन इंजिनिअर्स’ या कंपनीच्या अभियंत्यांकडून ही पाहणी करण्यात येत असून, याबाबतचा अहवाल ते पुणे महापालिकेला एका आठवड्यात सादर करणार आहेत. सुरत महापालिकेच्या पाठोपाठ आता पुणे महानगरपालिका स्वतःची मशिन घेण्यासाठी सज्ज झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा