गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पुणे-नगर महामार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

पुणे-नगर महामार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

पुणे : वाघोली येथील सातत्याने होणाऱ्या ट्रॅफिक संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार अशोक पवार, पीएमआरडीएचे नगररचनाकार विवेक खरवडकर यांच्यासह आज वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावरील कामांची पाहणी केली.

ट्रॅफिक समस्या सोडविण्यासाठी महामार्गावरील कामांना गती देऊन मुदतीमध्ये काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीएचे अधिकाऱ्यांना दिल्या.
खराडी जकात नाका, वाघेश्वर मंदिरचौकामध्ये पाहणी दरम्यान आमदार अशोक पवार, सरपंच वसुंधरा उबाळे व उपस्थित ग्रामस्थांनी बायपास, कचरा, ट्रॅफिक संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती सांगितली. वाघोलीतील समस्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्यता दिली असून प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने कामे पूर्ण केली जाणार असल्याचे राम यांनी सांगितले

error: Content is protected !!
Exit mobile version