पुणे : पुणे – नाशिक महामार्गावर खेड घात परिसरात रविवारी (दि. २४) पहाटे ३ च्या सुमारास दोन अवजड ट्रक बंद पडले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी दिवसभर म्हणजे तब्बल १४ तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
घाटाच्या सुरुवातिलाच वळणावर एक ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पुणे-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनी वाहतुकीचे नियम पळाले तर
वाहतूककोंडी होणार नाही. मात्र वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत नागरिक रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने बिनधास्तपणे चालवतात. यामुळे वाहतूककोंडी होते. महामार्गावरील खेड घाट जुना रस्ता असून तो अरुंद असल्याने व बाह्यवळणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे कोंडीने मोठे हाल होत आहेत.
पुणे नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते संगमनेर अशा महामार्गाचे चौपदरी करणाचे काम बाह्यवळणरस्ते वगळता पूर्णत्वाकडे आहे. राजगुरूनगर येथील बाह्यवळण घाट रस्त्याचे काम गेली चार वर्षे रखडले होते ते आता कसे तरी संथ गतीने सुरू झाले आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यातच पावसामुळे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे भरले मात्र, रस्त्याच्या कडेच्यासाईडपट्ट्या तशाच असल्याने हा महामार्ग मृत्यूचा साफळा बनला आहे. देशातील सर्वाधिक वाहतूककोंडीचा महामार्ग म्हणून पुणे-नाशिक महामार्गाकडे आता पहिले जात आहे. सण, सुट्टीच्यावेळी या महामार्गावर मोठी कोंडी होते.