पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात सुरू झालेले ‘वन स्टॉप सेंटर’ लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांसाठी जीवनदायी ठरत आहे. या केंद्राने आतापर्यंत शंभराहून अधिक पीडित मुलांना वैद्यकीय, कायदेशीर आणि समुपदेशनासारख्या सेवा पुरवून आधार दिला आहे.
‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत सुरू झालेला हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. ‘होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन’च्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या या केंद्राने पीडितांना एकाच ठिकाणी सर्व मदत उपलब्ध करून दिली आहे.
अशा घटनांमध्ये अनेकदा भीतीपोटी मुले समोर येत नाहीत, त्यामुळे पालकांनी पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या केंद्राच्या कार्यामुळे अनेक मुलांचे आयुष्य पुन्हा मार्गी लागले आहे आणि त्यांना आधार मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले











































