Prepaid Rickshaw Service at Swargate Bus Stand for Women’s Safety: स्वारगेट बसस्थानकात अलीकडेच झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, एसटी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. महिला प्रवाशांची सुरक्षा आणि प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात लवकरच प्रीपेड ऑटो रिक्षा सेवा सुरू करण्यात येणार आहे.
प्रवाशांची लूट थांबणार
स्वारगेट बसस्थानकातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रात्रीच्या वेळी प्रवाशांची संख्या अधिक असते. बसस्थानकात उतरल्यानंतर प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, काही रिक्षाचालक या संधीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारतात. यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होते. यावर उपाय म्हणून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात येत आहे.
प्रवाशांना सुरक्षित प्रवास;
एसटीतून रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. प्रीपेड रिक्षा सेवेमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि निश्चित दरात रिक्षा उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट टळेल आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता येईल.
प्रस्ताव मंजूर, लवकरच सेवा सुरू
पुणे रेल्वे स्थानकाप्रमाणे स्वारगेट बसस्थानकातही प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
प्रवाशांसाठी दिलासा
स्वारगेट बसस्थानकात प्रीपेड रिक्षा सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिला प्रवाशांना रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवास करता येईल, तर इतर प्रवाशांची
आर्थिक लूट टळेल.
प्रतिक्रिया
“पुणे रेल्वे स्थानकाप्रमाणे स्वारगेट बसस्थानकावर प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासाठी लागणारी परवानगी घेण्यात येत आहे. सर्व प्रक्रिया झाली की, प्रीपेड रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. बसच्या प्रवाशांना त्यामुळे फायदा होणार आहे.” अशी प्रतिक्रिया बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे