गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पुणे सोलापूर महामार्गावर वाहन चालकाचा थरार

पुणे सोलापूर महामार्गावर वाहन चालकाचा थरार

कुरकुंभ, दि.२६मे २०२०: कुरकुंभ येथील पुणे सोलापुर महामार्गावर असणाऱ्या दुभाजकामधील झाडाला धडकून बेदरकारपणे वाहन चालवताना प्रकार आढळून आला आहे.

कुरकुंभ येथील भराव पुलाच्या पूर्व दिशेकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच १२आर ऐन १९१६ च्या चालकाने एका लिंबाच्या झाडाला धडक देऊन ट्रकवर ते झाड जवळपास एक किलोमीटर उलट दिशेने घासत घेऊन गेला. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आवाज दिल्याने ट्रक चालक थांबला व त्याने काहीही झाले नसल्याचा आव आणत त्याला काहीच माहीत नाही अशा प्रकारचे वर्तन केले त्यामुळे सर्वच अचंबित झाले.

सध्या लॉक डाऊनमुळे महामार्गावर वर्दळ खूपच कमी असताना देखील अशा प्रकारचे अपघात होत आहे. वाहन चालक कुठल्यातरी नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत पोलिसांत अजून कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही परिणामी काय कारवाई होणार हे स्पष्ट नाही.

दरम्यान, एक किलोमीटरपर्यंत हे झाड वाहनाच्या टपावर अडकून जात असताना सुदैवाने दुचाकी अथवा लहान वाहनांच्या संपर्कात आले नाही तसेच विजेच्या तारा देखील न तुटल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती.

न्युज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

error: Content is protected !!
Exit mobile version