पुणे : पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, मांजरी बुद्रुक, मांजरी खुर्द, यांसह आणखी काही गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका स्थापन करण्याबाबत शासन विचाराधीन आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य अशोक पवार यांनी पुणे शहरालगतच्या काही भागातील पाणी, कचरा, वाहतुक या समस्या मांडल्या होत्या.
पुणे व पिंपरी-चिंचवड सोडून बाकीचा इतर भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत आला आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे सध्याचा २.५ एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढीव 5 एमएलडी पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे.
वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापनाकरिता प्राधिकरणाने वाघोली ग्रामपंचायतीला पंधरा कचरावाहू वाहने उपलब्ध करून दिली आहे.अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या नव्या महानगरपालिकेमुळे नव्याने समावेश होणाऱ्या गावांचा विकास झळत्याने होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे खेडी शहराला जोडली जाऊन विकास होण्यास मदत मिळणार आहे.