Sakshi Chhajed Record Breaking Performance: लंडनच्या थंडगार पाण्यात पुण्याच्या साक्षी मनोज छाजेडने इतिहास रचला! ‘स्वीमथॉन’ या जागतिक जलतरण स्पर्धेत साक्षीने २.५ किलोमीटरचे अंतर केवळ ४६ मिनिटांत पार करत सर्वोत्तम फिनिशरचा मान मिळवला. तिची ही कामगिरी केवळ कौतुकास्पद नाही, तर प्रेरणादायीही आहे.
साक्षीने प्रति १०० मीटर १.९ मिनिटांचा वेग राखत, जागतिक स्तरावरील जलतरणपटूंनाही मागे टाकले. ‘स्वीमथॉन’ ही स्पर्धा कर्करोगाच्या संशोधनासाठी निधी संकलित करते आणि या उदात्त कार्यात साक्षीने आपला मोलाचा वाटा उचलला आहे.
१९८६ पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आजवर अनेक दिग्गज जलतरणपटूंनी सहभाग घेतला आहे. साक्षीने या स्पर्धेत मिळवलेले यश, तिच्या कठोर परिश्रमाचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकलेल्या साक्षीने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप सोडली आहे.
साक्षीच्या या यशाने पुण्याचं नाव लंडनमध्ये उंचावलं आहे. तिची ही कामगिरी युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे