मार्चपासून सुरू होणार पुणे विद्यापिठाच्या परीक्षा

पुणे, १० फेब्रुवरी २०२१: पुणे विद्यापीठाच्या म्हणजेच सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून या परीक्षा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्च महिन्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाची परीक्षा ऑनलाइन होणार असली तरी ती विद्यार्थ्यांच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर होणार की महाविद्यालय स्तरावर होणार याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात समजणार आहे.

पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा १५ मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्चपासून सुरु होईल. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींशिवाय ही परीक्षा देता यावी, यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं विदयापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

महत्त्वचं म्हणजे या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ज्यामुळे कोरोना ची दक्षता घेण्याबाबत विद्यार्थ्यांना फारसे सतर्क राहणे गरजेचे नसणार. ऑनलाईन परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाची परीक्षा ऑनलाइन होणार असली तरी ती विद्यार्थ्यांच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर होणार की, महाविद्यालय स्तरावर होणार याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात समजणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा