पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, पुण्यात बुधवार पेठेत तरुणाला बेदम मारहाण

पुण्यातील बुधवार पेठ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. एका 39 वर्षीय तरुणाला पैशाच्या वादातून तीन महिलांनी बेदम मारहाण केली. ही घटना लालबत्ती परिसरात घडली, जिथे वेश्यागमनासाठी गेलेला तरुणाला बेदम मारहाण झाल्याची नोंद आहे.पेमेंट अॅपचा पासवर्ड विसरल्यामुळे रक्कम जमा होऊ शकली नाही त्यामुळे वाद सुरू झाला. यावरून त्याच्याशी तमन्ना ,तनुजा आणि सोनिया यांनी मिळून मारहाण सुरू केली. तिघींनी फिर्यादीला मारहाण करत संताप व्यक्त केला.

घटनेनंतर जखमी तरुणाने थेट फरासखाना पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने तीनही महिलांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

विशेष माहिती:

बुधवार पेठ परिसर पुण्यातील विविध विवादांमुळे प्रसिद्ध आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने स्थळावरील तपासणी केली.तीन महिलांनी मिळून तरुणावर बेदम मारहाण केली, ही घटना समाजात चर्चेचा विषय बनली आहे. ही घटना पैशाच्या वादातून भांडणाच्या गंभीर परिणामांची जाणीव करून देते.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील