पुण्यात होणार वुहान शहराप्रमाणे लॉक डाऊन

पुणे, दि. ८ मे २०२०: पुण्यामध्ये आता चीन मधील वुहान शहरासारखे लॉक डाऊन लागू करण्यात येणार आहे. कंटेनमेंट भागाचे निर्बंध आता मायक्रो लेवल ला म्हणजे ठराविक भागापुरते कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेच्या सहाय्यासाठी चार सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी प्रतिबंधित भागाचा पूर्णपणे बारकाव्याने अभ्यास करून पालिकेला त्यासंबंधित सूचना किंवा उपाय सुचवतील.

या चार सनदी अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये साखर आयुक्त सौरभ राव, सहकार आयुक्त अनील कावडे, पशुसंवर्धन आयुक्त रवींद्र प्रतापसिंग आणि भुजल सर्वेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर असे चार अधिकारी असतील.

तिसऱ्या लॉक डाऊन नंतर पुण्यातील एकूण स्थिती बघता पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात वर्दळ सुरू झाली आहे. इतकेच नव्हे तर प्रतिबंधित भागांमध्ये देखील नागरिक लावलेले बॅरिकेड्स ओलांडून बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता चक्क पत्र्याचे बॅरिकेड्स ठोकण्यात येणार आहे जेणेकरून प्रतिबंधित भागातील नागरिक बाहेर पडू नये.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार:

या भागातील सुमारे १ लाख नागरिकांना मिल्क पावडर, अन्नधान्यासह जीवनावश्यक कीट घरपोच देण्यात येणार आहे. याशिवाय २ लाख मास्क वाटण्यास सुरुवात केली. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, तेथे पुरेसे पाणी, साबण, जंतुनाशके, सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. तपासणीचा वेगही वाढवण्यात येणार आहे. जेणेकरून बाधितांचा लगेचच शोध
घेऊन, त्याचा आणखी फैलाव होऊ नये याची उपाययोजना करता येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा