गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘बहुरंग’चे युट्यूब चॅनल हॅक सायबर चोरट्यांनी व्हिडिओ डिलीट करून अपलोड केले ‘गेम...

‘बहुरंग’चे युट्यूब चॅनल हॅक सायबर चोरट्यांनी व्हिडिओ डिलीट करून अपलोड केले ‘गेम हॅक’!

सायबर गुन्हेगारांनी आता युट्यूब चॅनेल हॅक करून लाखो रुपयांचे व्हिडिओ चोरीला नेण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. ‘बहुरंग’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांचे दहा वर्षांपासूनचे युट्यूब चॅनल हॅक करून, त्यावरचे सर्व जुने व्हिडिओ डिलीट करण्यात आले आहेत.

सायबर चोरट्यांनी डॉ. केदारी यांचा मेल आयडी हॅक करून, त्याद्वारे युट्यूब चॅनलचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी ‘गेम हॅक’ नावाचे व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन-तीन दिवसांत दहा व्हिडिओ अपलोड करून, त्यांनी मूळ चॅनेलवरचे नाट्य, साहित्य आणि सामाजिक विषयांवरील लाखो रुपयांचे सर्व व्हिडिओ डिलीट केले. त्यामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे, असे डॉ. केदारी यांनी सांगितले.

या प्रकरणी त्यांनी सायबर क्राइम आणि चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर अभ्यासक ओंकार गंधे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. मेलला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन नसल्यास हॅकर्सना चॅनेलचा अॅक्सेस सहज मिळतो. त्यांनी सांगितले की, असे प्रकार टाळण्यासाठी सर्व युट्यूबर्सने आपल्या मेल आयडीसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्रिय करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, पासवर्ड रिसेट करताना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हॅकर्सना माहित नसतील, अशाप्रकारे ती सेट करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ऑनलाइन गेमिंग विधेयकामुळे चोरटे आता असे नवीन मार्ग शोधत असल्याचे दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version