मुंबई, १८ ऑक्टोबर २०२२: पुणे व आसपासच्या परिसरात काल रात्री झालेल्या पावसामुळे काही तासांतच पुण्याचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या तर, आर्थिक नुकसानही झाले. दरम्यान,आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पुणे बदलत असल्याचे बोललं जात आहे. मात्र काही तासांच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.
पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे. pic.twitter.com/fGJX1hPVwF
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 18, 2022
याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट केले आहे. नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील यांचे ट्वीट :
‘पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे असं म्हंटलं आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन!
कालच्या पावसाने शहरात धुमाकूळ घातला आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागसह दगडू शेठ हलवाई मंदिर, पेठा येथे पाणीच पाणी साचले होते. शहराच्या अनेक भागात गाड्या वाहून गेल्या आहेत. दरम्यान, आजही पुण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.