पुण्याच्या रिंगरोड प्रकल्पाला राज्यसरकार कडून निधी उपलब्ध,लवकरच प्रत्यक्ष कमला मिळणार गती

पुणे, दिनांक २५ ऑगस्ट २०२२ ; पुण्याच्या बहुचर्चित रिंगरोड प्रकल्पाला राज्यसरकार कडून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कमला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध नसल्याने हे काम बंद होते. रिंगरोड आस्तित्वात आल्यावर पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येवर प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पुण्यामध्ये रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ८३ गावांमधून भूसंपादन होणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळद्वारे उभारण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून १५,०० कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे.

त्यातील पहिल्या टप्प्यात २५० कोटींची तरतूद केली आहे. व हा निधी संबंधित प्रशासकीय विभागाला वर्ग करण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाने जमिनी मोजनीचे सुरू केले आहे. भूसंपादनासाठी ज्या गावांमधून मोजमाप केले जात आहे त्या गावांमधील मूल्यांकन प्रक्रिया प्रशासनाने आधीच सुरू केली आहे. व संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे मोजमापनाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली

या कामाला वेग येण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून,येत्या दोन महिन्यांत रिंगरोडचे काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. पुढील २४ महिन्यांत हे काम पूर्णत्वास येईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले, मात्र नवीन सरकारने महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली, त्यामुळे या प्रकल्पाला ही कात्री लागणार अशी शक्यता होती. परंतु राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे रिंगरोड प्रकल्प अखेर मार्गी लागणार, हे स्पष्ट झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा