गोल पोस्ट गुन्हा जबरदस्ती बलात्कार करणाऱ्या आरोपीस शिक्षा द्या..

जबरदस्ती बलात्कार करणाऱ्या आरोपीस शिक्षा द्या..

माढा, १९ डिसेंबर २०२०: नांदेड येथील बिलोली या गावी मातंग समाजातील मूकबधिर मुलीवर जबरदस्ती करून निघृन खून करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दलित स्वयंसेवक संघ कुर्डूवाडी शहराच्या वतीने प्रांताधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले.

सदरच्या निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर होणारे अन्याय, अत्याचाराची प्रकरणे सदैव घडत असून नीच कृती करणाऱ्या गाव गुंडास महाराष्ट्र शासनाने पायबंद घालून बिलोली येथील पीडित कुटुंबीयास शासनाकडून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताजी अडसूळ, माढा तालुकाध्यक्ष रणधीर लोंढे, शहर कार्याध्यक्ष संतोष कांबळे, शहर उपाध्यक्ष कपिल शिंदे, ज्योतिबा कांबळे, आदित्य लोंढे, प्रेम कांबळे, प्रेम लोंढे, सुरेश खिलारे, कानिफ कांबळे, नागेश कसबे, नितीन वायदंडे, अमोल थोरात, लखन कांबळे, अमर कांबळे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version