नीरा येथे मास्क न वापरता घराबाहेर पडणारांवर ग्रामपंचायतीची दंडात्मक कारवाई

पुरंदर, दि.५ जुलै २०२० : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बाजारपेठेत येणाऱ्या ज्या लोकांच्या तोंडाला मास्क नसतील अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यास ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस यांच्यावतीने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येत आहे. काल संध्याकाळी उशीरा सुरू झालेल्या कारवाई मध्ये एकूण पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्य शासनाने कोवीड-१९ या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाला गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र तरीदेखील अनेक लोक बाजारपेठत जाताना किंवा सार्वजनिक ठिकाणी येताना तोंडाला मास्क वापरत नाहीत. त्यामुळे कोवीड-१९ चा प्रसार होण्याच्या धोका वाढतो आहे. अशा लोकांवर ५०० रुपये पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस तसेच पत्रकार यांनी वेळोेवेळी मास्क वापरण्या संदर्भात जनजागृती केली होती. मास्क वापरावेत म्हणून लोकांचे पायही धरले होते. लोकांना गांधीगिरी करत मोफत मास्क वाटले. तरीदेखील अनेक लोक वीना मास्क फिरत असल्याचे आढळून येत होते. अखेर आज नीरा ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासनाची मदत घेत मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

नीरा शहर हे अत्यंत दाट वस्तीचे शहर असून या शहराच्या आजूबाजूच्या गावांमधून दररोज हजारो लोक बाजारपेठेमध्ये येत असतात त्यामुळे या भागात कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. लोकांनी मास्क वापरूनच बाजारपेठेमध्ये यावे. असे आव्हान नीरा ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय शिंदे व सदस्य अनिल चव्हाण यांनी केले आहे. अन्यथा अशा लोकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी असा इशारा त्यांनी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा