पंजाब, 6 जुलै 2022: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी विवाहबंधनात अडकणार आहेत. 48 वर्षीय भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. मान डॉक्टर गुरप्रीत कौरशी लग्न करणार आहे. हे लग्न गुरुवारी चंदीगडमध्ये होणार आहे. भगवंत मान आणि डॉ गुरप्रीत कौर यांना आशीर्वाद देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील चंदीगडला पोहोचू शकतात, असे सांगण्यात येत आहे.
सीएम भगवंत मान यांनी 2016 मध्ये त्यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुले आहेत, जी भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतात. पण आता घटस्फोटाच्या 7 वर्षांनंतर भगवंत मान यांनी आपले आयुष्य नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
“पंजाबसाठी सोडले कुटुंब”
भगवंत मान 2011 मध्ये राजकारणात आले. 2014 मध्ये ते पहिल्यांदाच आपच्या तिकिटावर संगरूरमधून खासदार झाले. त्यानंतर त्यांची पत्नी इंद्रजीत कौर याही त्यांच्या प्रचारामध्ये दिसल्या. मात्र, 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. भगवंत मान यांनी 2019 मध्ये संगरूरमधूनही निवडणूक जिंकली होती. पण 2022 मध्ये ते पंजाबमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. भगवंत मान यांनी 16 मार्च 2022 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांचा मुलगा आणि मुलगीही कार्यक्रमात सहभागी झाले होते. राजकारणामुळे कुटुंबाला वेळ देता येत नसल्याचे भगवंत मान म्हणाले होते. त्यामुळे ते पत्नीपासून दुरावले. इतकेच नाही तर घटस्फोटानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली. यामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबापेक्षा पंजाब निवडल्याचे सांगितले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे