पंजाब किंग्ज लखनौ सुपर जायंट्ससमोर अपयशी, 20 धावांनी पराभूत

LSG vs PBKS, 30 एप्रिल 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 20 धावांनी पराभव केला. 154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जला 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 133 धावाच करता आल्या. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

पंजाब किंग्जचा डाव (133/8)

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार मयंक अग्रवालने पंजाब किंग्जला वेगवान सुरुवात करून दिली. चमीराने बाद केलेल्या मयंकने 17 चेंडूत 25 धावांची खेळी खेळली, ज्यात दोन षटकार आणि तब्बल चौकारांचा समावेश होता. मात्र, मयंक बाद झाल्यानंतर पंजाब संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावणे सुरूच ठेवले.

संघाकडून जॉनी बेअरस्टोने 32 धावा केल्या आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 18 धावा केल्या, पण महत्त्वाच्या प्रसंगी त्याचे बाद होणे संघाला जड गेले. पंजाबकडून मोहसीन खानने सर्वाधिक तीन, तर कृणाल पांड्या आणि चमीराने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पहिली विकेट – मयंक अग्रवाल 25 धावा (35/1)
दुसरी विकेट – शिखर धवन 5 धावा (46/2)
तिसरी विकेट – भानुका राजपक्षे 9 धावा (58/2)
चौथी विकेट – लियाम लिव्हिंगस्टोन, 18 धावा (88/4)
पाचवी विकेट – जितेश शर्मा २ धावा, (92/5)
सहावी विकेट- जॉनी बेअरस्टो 32 धावा (103/6)
सातवी विकेट – कागिसो रबाडा, 2 धावा (112/7)
आठवी विकेट- राहुल चहर 4 धावा. (117/8)

लखनौ सुपर जायंट्स डाव (153/8)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी 13 धावांवर कर्णधार केएल राहुलची विकेट गमावली. अवघ्या 6 धावा करून राहुल रबाडाचा बळी ठरला. यानंतर दीपक हुडा आणि क्विंटन डी कॉक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावा जोडून डाव सांभाळला.

क्विंटन डी कॉकने 46 आणि दीपकने 34 धावांचे योगदान दिले. डेकॉक बाद झाल्यानंतर लखनौचा डाव गडगडला आणि त्यांना मोठी धावसंख्या गाठता आली नाही. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 तर राहुल चहरने दोन खेळाडूंना बाद केले.

पहिली विकेट – केएल राहुल 6 धावा (13/1)
दुसरी विकेट – क्विंटन डी कॉक 46 धावा (98/2)
तिसरी विकेट- दीपक हुडा 34 धावा (104/3)
चौथी विकेट – कृणाल पंड्या, 7 धावा (105/4)
पाचवी विकेट – आयुष बडोनी 4 धावा (109/5)
सहावी विकेट – मार्कस स्टॉइनिस 1 धाव, (111/6)
सातवी विकेट – जेसन होल्डर 11 धावा, (126/7)
आठवी विकेट- दुष्मंता चमिरा 17 धावा (144/8)

पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन, मयंक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (डब्ल्यूके), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (क), दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, आवेश खान, मोहसीन खान, दुष्मंता चमीरा, रवी बिश्नोई.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा