चिनी सैन्य लावतायेत पंजाबी गाणी…! भारतीय सैन्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

लढाक, १७ सप्टेंबर २०२०: एलएसीवर नजर ठेवणाऱ्या भारतीय सैनिकांना चिथावणी देण्यासाठी चिनी सैन्य दररोज काही विचित्र कुरापती करतायत. चिनी सैन्याच्या पीएलए’नं फिंगर फोरवर मोठे लाऊडस्पीकर लावून पंजाबी गाणे वाजवायला सुरुवात केलीय. हे स्पष्टपणे भारतीय सैनिकांचं लक्ष वळविण्याच्या उद्देशानं केलं गेलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीननं आपल्या ज्या चौकीत लाऊडस्पीकर लावले आहेत त्या चौकीवर भारतीय सैन्याची चोवीस तास पाळत आहे.

चीनचा मनसुबा काय आहे

भारतीय सैन्याच्या सतत असलेल्या चोख देखरेखीला चिनी सैन्य मेटाकुटीला आलं असणार, त्यामुळंच त्यांनी पंजाबी लोकप्रिय गाणी लावून भारतीय सैन्याचं लक्ष भटकण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे. ही जागा त्याच ठिकाणी आहे जिथे काही दिवसांपूर्वी धारदार शस्त्रे असलेले चिनी सैनिक ताबा घेण्याच्या उद्देशानं आले होते आणि त्यांनी सुमारे १०० गोळ्यांची फायरिंग केली होती. तथापि, भारतीय सैन्याच्या प्रति उत्तरामुळं त्यांना परत जाणं भाग पाडलं.

भारत-चीन चर्चा सुरू राहण्याची शक्यता

दोन्ही देशांमधील सैन्य आणि मुत्सद्दी चर्चेच्या फेऱ्यांद्वारे सीमेवरची परिस्थिती सामान्य करण्यासाठी भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील कराराची अंमलबजावणी सुरूच राहणं अपेक्षित आहे. बुधवारी केंद्र सरकारनं ही माहिती दिली.

अनेक ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न

परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना पूर्व लडाखमधील चार महिन्यांच्या तणावाची थोडक्यात माहिती देऊन म्हटलं की चीननं अनेक ठिकाणी एलएसी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. सैन्याच्या योग्य प्रति उत्तरामुळं त्यांना यात यश आलं नाही.

परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

स्पष्टीकरणात त्यांनी सांगितलं की, मॉस्कोमध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वांग यी यांच्यात झालेल्या बैठकीत एलएसीवरील विवाद समाप्त करण्यासाठी पाच मुद्द्यांवर सहमती दर्शविली गेलीय. या कराराच्या आधारे दोन्ही देशांमधील वाटाघाटी होण्याची अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा