पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले आहेत.
मोहोळ यांच्या विरोधात आघाडीचे प्रकाश कदम यांचा पराभव झाला. या निवडणुकीतचे वैशिष्टय म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजप – शिवसेना युती तुटल्याचे पडसाद या बघायला मिळाले.
यावेळी शिवसेनेने आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. महापौरपदाच्या निवडणुकीत मोहोळ यांना ९७ तर कदम यांना ५९ मते मिळाली. यावेळी मनसेचे २ नगरसेवक तटस्थ तर पाच नगरसेवक मतदानावेळी गैरहजर होते. कौस्तुभ दिवेगावकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम बघितले.

२०१७ साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपला निर्विवाद बहुमतानुसार ९७ तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३९ नगरसेवक आहेत. शिवसेनेचे १०, काँग्रेसचे ९, मनसे २ आणि इतर ५ अशी नगरसेवक संख्या महापालिकेत असल्याने मोहोळ यांची निवड झाली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा