गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्याचा नवा महापौर २६ नोव्हेंबरला ठरणार

पुण्याचा नवा महापौर २६ नोव्हेंबरला ठरणार

पुणे : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच पुण्याच्या नव्या महापौरांची निवड येत्या २६नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महापौरपदासाठी येत्या बुधवारी (दि.२०) अर्ज भरण्याची मुदत आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.

महापौरपदाच्या निवडणुकीत महापालिकेत भाजपविरोधात सर्वपक्षीय उमेदवार असण्याची चिन्हे आहेत. विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांचा कार्यकाळ येत्या २१ नोव्हेंबरला संपत आहे.
त्यामुळे या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार असून, त्यानुसार येत्या २६ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता निवडणूक होईल. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version