गोल पोस्ट राजकारण आशीष शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीका

आशीष शेलार यांची शिवसेनेवर जोरदार टीका

मुंबई : भाजपचे आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले “वय वाढले की परिपक्वताही वाढावी”, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लावला.
पुढे ते म्हणाले की, “काल संजय राऊत यांनी मोदींवर जो आदर आणि प्रेम व्यक्त केले तो स्वार्थापोटी होता की खरा होता हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना समजण्यासाठी संजय राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील. मंदिराची शपथ घेऊन राजकीय स्वार्थासाठी असत्य पसरवणे हे महाराष्ट्राला मान्य नाही. अमित शहा हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्यांनी जे सांगितले आहे तेच सत्य आहे.”
संजय राऊत यांनी असत्य कोणी पसरवत आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता त्याचे उत्तर देताना ते म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणारे कोण आहेत हे महाराष्ट्र रोज मीडिया मार्फत पाहत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version