पुण्याच्या उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे

31

पुणे : पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपच्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची निवड करण्यात आली आहे. शेंडगे यांना ९७ मते पडली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीच्या उमेदवार चादबी नदाफ यांना ५९मते पडली.

पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड झाल्यानंतर उपमहापौरपदासाठी मतदान झाले. त्यात शेंडगे यांना भाजपची ९७ मते मिळाली. तर नदाफ यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ५९ मते मिळाली. मनसेच्या नगरसेवकांनी मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा