गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पुण्यामध्ये मुसळधार पाऊस

पुण्यामध्ये मुसळधार पाऊस

पुणे: राज्यभरात ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात पावसाचा जोर राज्यभरात चांगलाच वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहे व धरणातून ही पाणी सोडण्यात आले आहे. पण पुण्यामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. या विश्रांतीमुळे पुणेकरांनी सुटकेचा निश्वास घेतला होता.
परंतु आज रात्री सात वाजल्यापासून पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. पाऊस तीव्रतेने पडत असल्यामुळे ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठले आहे व त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पुण्याला चांगलेच झोडपून काढले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version