पुण्यामध्ये पिक विमा कंपनीच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

41

पुणे: पीक विम्याचा वाटप करणाऱ्या इफ्को टोकियो या कंपनीच्या ऑफिसचे पुण्यामध्ये कोरेगाव पार्क येथे शिवसैनिकांकडून नुकसान करण्यात आले. शिवसैनिकांनी कंपनीचे ऑफिस मधील काचा, खुर्च्या, कम्प्युटरस या सर्वांची तोडफोड केली आहे. शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी या कार्यालयाची तोडफोड केली.
अतिरिक्त पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. कंपनी शेतकऱ्यांना झालेल्या पिकांच्या नुकसान ची रक्कम देण्यास नकार देत आहे असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच या आधीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे पैसेही कंपनीने अजून पर्यंत दिलेले नाहीत असे शिवसेनेचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा