पुण्यात ३२ एसआरपीएफ जवान कोरोना बाधित

पुणे, दि.२७मे २०२०: सध्या मुंबई आणि पुणे राज्याचे कोरोना व्हॉटस्पॉट बनले आहेत , त्यात पुण्यात वाढत चाललेला कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यात सामान्य नागरिकांना तर कोरोनाची लागण होतच आहे. मात्र पुण्यातील ३२ एसआरपीएफच्या जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या जवानांना कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. मात्र ३२एसआरपीएफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकूण २००जवानापैकी ९८ जवान हे कोरोनाबाधित झाले आहेत. मात्र त्यातील अनेक जण बरे होऊन घरी परतले आहेत.

मात्र, पुणे विभागातील ३ हजार ६७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ हजार ७१९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण ३ हजार ६८९ आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण ३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१५ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात सध्या ६ हजार ३०३ बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित ३ हजार १९५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २ हजार ८१९ आहे. कोरोनाबाधित एकूण २८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ५०१ ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यातील ४०४ रुग्णांचा समावेश आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा