पुण्यात आढळली बेवारस जुळी अर्भके

29

पुणे: पुण्यातील पाषाण तलावाजवळ जुळी अर्भके आढळून आल्याची घटना समोर आली आहे. भर थंडीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना ही जुळी अर्भक दिसली. पाषाण तलावाजवळून जात असताना नागरिकांना ब्लँकेटमध्ये दोन जुळी नवजात अर्भक गुंडाळलेल्या अवस्थेत आढळली.
ही दोन्ही बालक एक दिवसाची असून थंडी आणि भुकेने व्याकुळ झाल्याने रडत होती.
परिसरातील नागरिकांनी दोन्ही बाळांना दूध पाजले. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. या दोन्ही बालकांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत.
या दोन्ही बालकांची तब्येत व्यवस्थित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या बालकांना सोडणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहे.