पुणे – पुण्यात बुधवारी रात्री (2५ सप्टेंबर) पावसाने थैमान घातले होते. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे टांगेवाला कॉलनीमध्ये भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. या सात मयतांपैकी ५ जणांच्या कुटुंबियांना भरपाईच्या धनादेशाचे वाटप शनिवारी करण्यात आले.
अरण्येश्वर परिसरातील टांगेवाला कॉलनीत भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. यातील पाच जणांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून चार लाख रुपये देण्यात आले. आशा संतोष कदम, संजय भिवाजी राणे, विठ्ठल भीमराव शिंदे, विकास गजानन अतितकर आणि सुवर्णा मंगेश लांघे या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. धनादेश वाटपावेळी उर्वरित दोन जणांचे कुटुंबीय कोल्हापुरला असल्याचे त्यांचे धनादेश तयार करून ठेवण्यात आले आहेत.