गोल पोस्ट महाराष्ट्र पुण्यात रेल्वे स्थानकाजवळ सापडला हॅन्डग्रेनेड बॉम्ब

पुण्यात रेल्वे स्थानकाजवळ सापडला हॅन्डग्रेनेड बॉम्ब

पुणे: पुण्यातील ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील बाजूला हँडग्रेनेड बॉम्ब सापडला आहे. याची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक घटनास्थळी त्वरित दाखल झाले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा बॉम्ब निकामी करण्यास पथकाला यश आले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याच ठिकाणी रेल्वे प्रशासनाचे मुख्य कार्यालय आहे. त्यामुळे एखादी मोठी घटना घडविण्याचा कुणाचा डाव होता की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version