पुण्यातील तीन मित्रांनी दिला २००० विद्यार्थ्यांना आधार !

पुणे: देशात सध्या लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी पुणे शहरात अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय त्यांना बिस्कीट खाऊन दिवस काढावे लागत आहेत. मात्र,या विद्यार्थ्यांना पुण्यातील तीन मित्रांनी आधार दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे.
पुण्यातील हरीश टिंबोळे, राहुल आणि गजानन या तिघांनी आपल्या ओळखीने या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय केली आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून या तिघांकडून विद्यार्थ्यांना मोफत जेवण पार्सल स्वरूपात दिले जात आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी २००० विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोय करण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा