पुण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सागर घोरपडेनी जपली गायनाची कला

51

पुणे :  आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कोण काय करेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर आपण अनेक जण आपल्या आवाजातील व्हिडीओ व्हायरल करत असतात. परंतु त्यात आता पुण्यातील “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” म्हणणारी नोकरी जपत गायनाची संवेदनशील कला ही सागर घोरपडे यांनी जपली आहे.
सध्या सागर घोरपडे यांनी गायलेल्या मरजावा या चित्रपटातील गायलेल्या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
पुणे पोलीस दलातील क्राइम ब्रँच मध्ये काम करणारे कॉनस्टेबल सागर घोरपडे हा सोशल मीडीयाचा नवा हिरो ठरू लागले आहेत. सागर हा अत्यंत सुरेल आवाजाचा गायक असल्याने त्याने रेकॉर्ड केलेलं गाणं हे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहे. तसंच त्याच्या आवाजाचंही प्रचंड कौतुक सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
एखाद्या कसलेल्या गायकाप्रमाणे गाणारा हा वर्दीतला गायक आहे विठ्ठल उर्फ सागर घोरपडे. सागरने त्याच्या २७डिसेंबर या च्या वाढदिवसानिमित्त गायलेलं गाणं फेसबुकला टाकलं. आणि चक्क तीनच दिवसात हे गाण तब्बल १५ लाख जणांनी पाहिलं आहे. सागरच्या आवाजाचं प्रचंड कौतुक सोशल मीडीयावर सुरू आहे.

सागर मूळचा सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या मंगळवाडीचा. घरी कीर्तन आणि हरिनाम सप्ताहात गाण्याची त्याला सवय होती. मात्र २०१२ मध्ये पोलीस दलात भरती झाल्यापासून स्टेजचा आणि त्याचा संपर्क तुटला. मात्र अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये गायल्यावर त्याला अनेक मित्रांनी गाण गात राहाण्याची मागणी केली. त्यानुसार त्याने काही गाणी रेकार्ड करून फेसबुकला टाकल्यावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
वर्दीतला हा दर्दी बघून आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडीयालाही राणू मंडल नंतर आणखी एक हिरो मिळाला आहे, अशी चर्चा आता पुण्यात होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा