पुण्यातील तीन मित्रांनी दिला २००० विद्यार्थ्यांना आधार !

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉक डाऊन केलेला आहे. मात्र या अचानक केलेल्या लॉक डाऊनमुळे अनेक दुसऱ्या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी पुणे शहरातील पेठांमध्ये अडकून पडले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच गोष्टी बंद आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जेवणाचे मोठे हाल होत आहे. पहिले दोन दिवस तर विद्यार्थ्यांनी बिस्कीट खाऊन काढावे लागले. अनेक मेस चालकांना जेवण बनविण्याची विनंती केली मात्र, कोणीही तयारी दाखवली नाही. याबाबत हरिश टिंबोळे नावाच्या एका व्यक्तीने या मुलांचे हाल पाहिले. विद्यार्थ्यांनी आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली.

त्याचवेळी तेथे गजानन ठोकळ, व राहुल देशमुख हे तरुण देखील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आम्ही तुम्हाला जेवण उपलब्ध करून देतो असे सांगितले. त्यांच्यात हरीश टिंबोळे, राहुल आणि गजानन या तीन मित्रांनी आपल्या परिचयातील अनेकांना फोन केले. परंतु तरीही कोणीही जेवण देण्यास तयार झाले. एका ठिकाणी विचारले ते लोक जेवण द्यायला तयार आहेत. मात्र आमच्याकडे मदतीला लोक नाही. तेव्हा या मित्रांनी आम्ही मदतीला येतो असे सांगितले.

त्यानंतर जेवण वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला.
पहिल्या दिवशी केवळ ४० मुलांना दोन वेळेचे जेवण देण्यात आले. त्यानंतर दररोज मुलांच्या संख्येत वाढ होत असून आजपर्यंत जवळपास २००० जेवणाचे मोफत पार्सल वाटप केले जात आहे.

हे मोफत जेवण वाटप करण्यासाठी पुण्यातील विविध सामाजिक संस्था व वैयक्तिक पातळीवर मित्र मदत करत आहेत. त्यात स्वामी विवेकानंद पतसंस्था अँड वाणी चेंबर्स आँफ कामर्स, कँटलिस्ट फाऊंडेशन, भगवे ट्रेकर्स, वंदेमातरम, आयएएस अँकडमी अँड रिसर्च सेंटर आणि गजानन बुक सेंटर यांच्या मदतीने गजानन बुक सेंटर येथे दररोज सकाळी नाष्टा वाटप तर दुपारीव रात्री जेवण वाटप केले जात आहे. या जेवणाचा लाभ लोकमान्य नगर, नवी पेठ व सदाशिव पेठेसह नारायण पेठेतील विद्यार्थी घेत आहेत.
या विद्यार्थ्यांना संकटाच्या वेळी गजानन ठोकळ, राहूल देशमुख, भैरव इंगोले, युवराज पवार आणि हरिश टिंबोळे हे या मुलांचे आधारस्तंभ बनले आहेत. “कोणीही उपाशी राहू नका आम्ही आहोत” या एकाच टॅग लाईन खाली प्रा. हरिश टिंबोळे व टीम कार्यरत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा