पुरंदर दि. २९ जुलै २०२० :मार्च २०२० मध्ये झालेल्या इयत्ता दहावीचा वार्षिक परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. यामध्ये सासवड येथील वाघिरे विद्यालयाची विद्यार्थी ऋतुजा प्रकाश जगताप हि ९७. ८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच याच विद्यालयाची सई सदानंद बडदे आणि वाल्हे येथील महर्षी वाल्मिक विद्यालयाची विद्यार्थिनी निर्जरा नितीन कुमार या दोघींनी ९७. ६० टक्के समान गुण मिळवून तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
वाघिरे विद्यालायाचीच साक्षी नितीन पुरंदरे हिने ९७. ४० टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. त्याच प्रमाणे जेजुरीच्या जिजामाता हायस्कूल ची विद्यार्थिनी महेक पठाण फिरोज आणि वाघिरे विद्यालयाच्या राजगौरी विठ्ठल गायकवाड यांनी ९७ टक्के समान गुण मिळवून तालुक्यातून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.
पुरंदर तालुक्यातील एकूण ६५ माध्यमिक विद्यालयांपैकी तब्बल ४९ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यात एकूण २९३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यातील २८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा एकूण शेकडा निकाल ९८. ४६ टक्के इतका लागला आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार सागर, वाघिरे विद्यालयाचे मुख्या ध्यापक रामदास शिंदे, सह सचिव सुधाकर जगदाळे, रामदास जगताप, पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भगवंत बेंद्रे, सचिव रामदास जगताप, उपाध्यक्ष प्रा.हनीफ मुजावर, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष इस्माईल सय्यद, सचिव दिलीप पापळ, जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसंतराव ताकवले, तानाजी झेंडे, संजय भिंताडे, रामप्रभू पेटकर, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्रा. निलेश जगताप, शिक्षेकेतर संघाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
पुरंदर तालुक्यातील १०० टक्के निकालाच्या विद्यालयांची नावे पुढील प्रमाणे –
वाघिरे विद्यालय सासवड, जिजामाता हायस्कूल जेजुरी, शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल सासवड, सोपानकाका हायस्कूल सासवड, हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी, कर्मवीर विद्यालय परिंचे, पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय वाघापूर, शंकरराव ढोणे विद्यालय गराडे, शिवाजी विद्यामंदिर आंबळे, कृषी औद्योगिक विद्यालय चांबळी, डॉ. शंकरराव कोलते विद्यालय पिसर्वे, पारेश्वर विद्यालय पारगाव मेमाणे, ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळुंचे, न्यू इंग्लिश स्कूल पांगारे, यशवंत विद्यालय मावडी कप, न्यू इंग्लिश स्कूल मांडकी, भुलेश्वर विद्यालय माळशिरस, श्री. सिद्धेश्वर विद्यालय नायगाव, महर्षी वाल्मिक विद्यालय कोळविहीरे, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे, शिवशंभो विद्यालय एखतपूर – मुंजवडी, माध्यमिक विद्यालय मांढर, केदारेश्वर विद्यालय काळदरी, नागेश्वर विद्यालय नाझरे, डॉ. पतंगराव कदम विद्यालय दौंडज, माध्यमिक विद्यालय यादववाडी, श्री कानिफनाथ विद्यालय भिवरी, श्री भैरवनाथ विद्यालय वनपुरी, मातोश्री जिजाई सोपानराव जाधव हायस्कूल साकुर्डे, मावडी पिंपरी हायस्कूल पिंपरे, हरणी माध्यमिक विद्यालय हरणी, आदर्श माध्यमिक विद्यालय केताकावळे, न्यू इंग्लिश स्कूल पिंपळे, न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन, न्यू इंग्लिश स्कूल गुरोळी, शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद, सद्गुरू श्री नारायण महाराज विद्यालय नारायणपूर, राजे शिवराय विद्यालय पानवडी, श्री बी एस काकडे विद्यालय पिंपरे खुर्द, गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे, वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय पिंगोरी, राजुरी माध्यमिक विद्यालय राजुरी, श्री सद्गुरू कानिफनाथ माध्यमिक विद्यालय बोपगाव, पुरंदर पब्लिक स्कूल जेजुरी, गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल, निवासी शाळा दिवे, जिजामाता इंग्लिश मेडियम स्कूल जेजुरी, शारदा इंग्लिश मेडियम स्कूल वाघापूर, इंदू इंग्लिश स्कूल कोळविहीरे, श्रीनाथ एजुकेशन सोसायटी इंग्लिश मेडियम स्कूल वीर, या ५० विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी