खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत, जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक महाजनला कांस्यपदक

जळगाव , १६ ऑक्टोंबर २०२३ : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि उत्तर प्रदेश तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक ५ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी नोयडा इनडोअर स्टेडियम येथे दुसऱ्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत २२०० खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता, त्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून उपविजेतेपद पटकावले.

वरीष्ठ गटात जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याने ८७ किलो आतील वजन गटात कांस्यपदक पटकावले. त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच शासनाचे क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रविण बोरसे सर याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन, तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे सर यांनी अभिनंदन केले

न्यूज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा