‘या’ आजाराशी झगडत आहे पुतीन, पुढच्या वर्षी सत्ता सोडण्याची शक्यता

मॉस्को, ६ नोव्हेंबर २०२०: रशियाचे राष्ट्रपती पुतीन पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पुतीन सध्या एका गंभीर आजारानं त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. मॉस्कोचे राजकीय शास्त्रज्ञ वलेरी सोलोवी यांनी द सनला सांगितलं की, रशियन अध्यक्षांची ३७ वर्षीय प्रेमिका अलिना काबेवा आणि तिच्या दोन मुली पुतीन यांना असं करण्यास सांगताहेत.

ते म्हणाले की रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं यासाठी त्यांनी आपलं पद सोडावं अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुतीन यांची प्रेमिका जिम्नॅस्ट अलिना कबाइवा आणि तिच्या दोन मुलींनी राजीनामा द्यावा असं आवाहन केलं आहे.

सोलोवी यांनी असाही दावा केला आहे की, पुतीन यांना पार्किंसन आजाराची लागण होऊ शकते, कारण अलीकडंच त्यांच्यात या आजाराची लक्षणं दिसून आली होती. द सन च्या अहवालानुसार, पुतीन यांच्या पायामध्ये थरकाप येत असल्याचं दिसून आलं होतं. म्हणजे त्यांच्या पायामध्ये थरथर होत असल्याचे दिसून आलं. पाय थरथर कापणं हे याच आजाराचं लक्षण आहे.

अहवालात असं देखील म्हटलं गेलं आहे की, त्यांच्या बोटांमध्ये देखील समस्या दिसून येत आहेत. जे एका फूटेजमध्ये देखील दिसून आलं. पुतीन यांच्या पद सोडण्याची अटकळ अशा वेळी आली आहे जेंव्हा रशियाचे अध्यक्ष राष्ट्रपतींनी प्रस्तावित केलेल्या कायद्याचा विचार करीत आहेत. या नवीन कायद्याअंतर्गत रशियातील माजी राष्ट्रपतींना कोणत्याही गुन्ह्यातील खटल्‍यापासून आजीवन सुरक्षा प्रदान केली जाईल.

रशियाचे अध्यक्ष पुतीन हे सध्या ६८ वर्षांचे आहेत. ७ मे २००० रोजी त्यांनी सर्वप्रथम हा पदभार स्वीकारला. याशिवाय पुतीन यांनी रशियाच्या पंतप्रधान पदाचा देखील कारभार संभाळला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा