पुतीन यांच्या धमकीने युरोपला धक्का, जाणून घ्या गॅससाठी हे देश रशियावर किती अवलंबून

Russia Ukraine war, 30 एप्रिल 2022: युक्रेनशी युद्ध सुरू असताना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या धमकीने संपूर्ण युरोपला धक्का बसला आहे. पुतिन यांनी गेल्या महिन्यात धमकी दिली होती की रशियाकडून गॅस खरेदी करण्यासाठी “नॉन-फ्रेंडली देशांना” रशियन रूबल चलनात पैसे द्यावे लागतील. आता रशियाने रुबलमध्ये पैसे न दिल्याने बल्गेरिया आणि पोलंडचा गॅस पुरवठा बंद केलाय. त्याच वेळी, एका अहवालात म्हटलं आहे की पुतीन यांच्या धमकीनंतर चार युरोपीय देश नतमस्तक झाले आहेत आणि रूबलमध्ये पैसे देण्यास तयार आहेत.

युक्रेनशी युद्ध सुरू असतानाही रशियाने युरोपीय देशांना गॅसचा पुरवठा सुरूच ठेवला होता. पण, नंतर जेव्हा युरोपीय देश रशियाच्या विरोधात उभे राहू लागले तेव्हा पुतिन यांनी धमकी दिली की गॅस घ्यायचा असेल तर पैसे रुबलमध्ये द्यावे लागतील.

रशियाच्या राज्य गॅस एजन्सी गॅझप्रॉमने पोलंड आणि बल्गेरियाला रुबलमध्ये पैसे न दिल्याबद्दल गॅस पुरवठा थांबवलाय. यानंतर संपूर्ण युरोपमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलंड आणि बल्गेरियाने रशियावर ‘ब्लॅकमेल’ केल्याचा आरोप केलाय. बल्गेरियाचे पंतप्रधान किरिल पेटकोव्ह यांनी याला ब्लॅकमेल म्हटलं आणि गॅझप्रॉमने गॅस वितरण थांबवणं हे कराराचं उल्लंघन असल्याचं सांगितलं. या रॅकेटपुढं आम्ही झुकणार नाही.

दरम्यान, बुधवारी युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांनीही तातडीची बैठक घेतली. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी सांगितलं की, रशिया गॅसच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, रशियाच्या राष्ट्रपती भवन क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी ब्लॅकमेलचे आरोप फेटाळून लावले आहेत.

त्याचवेळी पुतीन यांच्या धमकीपुढं आता युरोपीय देश नतमस्तक झाले आहेत. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाच्या विरोधात उभे असलेले युरोपीय देश आता गॅससाठी बॅकफूटवर आहेत. एका अहवालानुसार, इटलीसह चार देशांनी रुबलमध्ये पैसे देण्याचं मान्य केलंय.

तेल आणि गॅससाठी युरोपीय देश रशियावर किती अवलंबून?

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या मते, 2021 मध्ये युरोपियन युनियन देशांनी निर्यात केलेल्या 45 टक्के गॅस रशियामधून आला होता. रशियन गॅस युरोपियन युनियन देशांच्या 40 टक्के गरजा पूर्ण करतो.

रशिया आपला बहुतेक गॅस पाइपलाइनद्वारे करतो. ऊर्जा क्षेत्रावर देखरेख ठेवणाऱ्या BP.com च्या आकडेवारीनुसार, युरोपियन युनियनच्या देशांनी 2020 मध्ये 562 अब्ज घनमीटर गॅस निर्यात केला, त्यापैकी 185 अब्ज घनमीटर रशियामधून आला.

रशियन गॅसवर जर्मनी सर्वात जास्त अवलंबून आहे. जर्मनीने 2020 मध्ये रशियाकडून 56.3 अब्ज घनमीटर गॅस खरेदी केला. त्यानंतर इटलीचा क्रमांक लागतो, ज्याने 19.7 अब्ज घनमीटर गॅस खरेदी केला. तिसऱ्या क्रमांकावर तुर्की आहे, ज्याने 15.8 अब्ज घनमीटर गॅस खरेदी केला आहे.

रशियाच्या गॅस, कच्चे तेल आणि कोळसा यावर युरोप अवलंबून

युरोप मुख्यत्वे रशियन वायू, कच्चे तेल आणि कोळसा यावर अवलंबून आहे. 2019 मध्ये युरोपच्या एकूण गॅस निर्यातीत रशियाचा वाटा 41.1 टक्के होता. त्याच वेळी, रशियाचा कच्च्या तेलात 26.9 टक्के आणि कोळशाच्या निर्यातीत 46.7 टक्के वाटा होता.

रशियाचे तेल आणि गॅस मार्केट किती मोठे?

कच्चे तेल: रशिया हा अमेरिका आणि सौदी अरेबियानंतर कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या मते, 2021 मध्ये रशियाने दररोज 10.5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन केलं. गेल्या वर्षी रशियाने दररोज 4.7 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केली. एकट्या रशियाने युरोपला दररोज 2.4 दशलक्ष बॅरल कच्चं तेल निर्यात केलं.

गॅस: रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा गॅस उत्पादक देश आहे. रशियाचे स्वतःचे गॅस पाइपलाइन नेटवर्क आहे, जे बेलारूस आणि युक्रेनद्वारे संपूर्ण युरोपला गॅस पुरवठा करते. IEA च्या मते, रशिया युरोपियन देशांच्या 40 टक्क्यांहून अधिक गॅस गरजा पूर्ण करतो. जर्मनी आणि इटली हे देश रशियन वायूवर सर्वाधिक अवलंबून आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा