बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि बॉक्सिंगमध्ये पूजा राणीने मारली बाजी

टोकियो, २९ जुलै २०२१: भारतीय कन्यांनी बुधवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये जोरदार कामगिरी केली.  बॉक्सिंगमध्ये पूजा राणीने महिलांच्या ७५ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.  आणखी एक सामना जिंकून तिचे पदक निश्चित होईल.  त्याचबरोबर बॅडमिंटनमधील पीव्ही सिंधू आणि तिरंदाजीत दीपिका कुमारी यांनी महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय.  मात्र महिला हॉकी संघाला सलग तिसर्‍या पराभवाला सामोरं जावं लागलं.
साउंड ऑफ १६ च्या सामन्यात पूजाने अल्जेरियाच्या इचराक चाईबचा ५-० असा पराभव केला.  तिन्ही फेऱ्यांमध्ये पूजाला पाचही पंचांकडून पूर्ण गुण मिळाले.  तिच्या अगोदर लोव्हलिना बोर्गोहेन ने देखील ६९ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.  तिरंदाजी महिला एकेरीत दीपिका कुमारी दुसर्‍या फेरीचा सामना खेळत आहे.  ती सध्या अमेरिकन तिरंदाजांविरुद्ध ४-४ अशी बरोबरीत आहे.
नेमबाजीत दीपिकाने राऊंड ऑफ ३२ एलिमिनेशन मध्ये भूटानच्या कर्मा ला ६-० ने पराभूत केलं. यानंतर तिने राऊंड ऑफ ३२ एलिमिनेशन मध्ये अमेरिकेच्या जेनिफर फर्नांडेज ला ६-४ ने पराभूत केलं. दीपिका या सामन्यांमध्ये पहिला सेट हरली होती. यानंतर पुढील दोन सेट जिंकत तिने ४-२ अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा अमेरिकेच्या बॉक्सर ने बाजी मारत सामना ४-४ वर आणला. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये दीपिकाने विजय मिळवला आणि सामना ६-२ ने आपल्या नावे केला. तिरंदाजीत मेन्स सिंगल मध्ये प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय पराभूत होऊन बाहेर पडले.
प्रवीणचा अमेरिकेच्या ब्रॅडी एलिशन ६-० असा पराभव केला.  पहिल्या सामन्यात प्रवीणने रशियाच्या गॅलसन बाझारापापोव्हचा ६-० असा पराभव केला होता.  इस्राईलच्या इटय शायनीने शूटिंगमध्ये तरूणदीप रायचा पराभव केला.  तीन सेटनंतर, दोन्ही तिरंदाज ५-५ गुणांनी बरोबरीत होते.  शूट ऑफमध्ये रायने ९ आणि शायनीने १० गुण मिळवले.  यापूर्वी रॉयने ३२ एलिमिनेशन सामन्यांच्या फेरीत युक्रेनच्या ओलेक्सिल हॅनबिनचा ६-४ असा पराभव केला होता.
दुसरीकडं भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही तिच्या गटातील दुसरा सामना जिंकलाय.  ग्रुप जे मध्ये तिने ३५ मिनिटांत हाँगकाँगच्या एनगान यी चेयुंग चा२१-९, २१-१६ असा पराभव केला.  पहिला सामनाही सिंधूने जिंकला.  अशा प्रकारे सिंधू बाद फेरीपर्यंत पोहोचलीय.  प्री-क्वार्टर फायनलमध्ये आता सिंधूचा सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डशी होईल.
महिला हॉकी संघाची पराभवाची हॅटट्रिक
 भारताच्या महिला हॉकीने सलग तिसरा सामना गमावला.  बुधवारी झालेल्या सामन्यात ब्रिटनने भारतीय संघाचा ४-१ असा पराभव केला.  ब्रिटनकडून हॅना मार्टिनने दोन आणि लिली ओस्ली आणि ग्रेस बाल्डडनने १-१ गोल केला.  शर्मिला देवीने भारतासाठी एकमेव गोल केला.  तत्पूर्वी, भारतीय महिला संघ नेदरलँड्सकडून १-५ आणि जर्मनीकडून ०-२ असा पराभूत झाला होता.  भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची अजूनही आशा आहे.  आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत अद्याप खेळलेला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा